पॅसेजमध्येच रुग्णांना ऑक्सिजन; डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार...

kdmc shastrinagar hospital
kdmc shastrinagar hospital

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेकडून आरोग्य सुविधासह वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खाटांची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या आठ हजाराच्या पुढे गेली आहे, तर उपचार घेणारी संख्या पाच हजाराच्या पुढे आहे.

केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात  57 बेडचे कोव्हिड केअर सेंटर आहे. मात्र, या रुग्णालयातील खाटांची क्षमता संपली असून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील आणि पॅसेजमधील कठड्यावर बसवून रुग्णांना ऑक्सिजन लावले जात असल्याचे समोर आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल असलेले आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेले रुग्ण एका पाठोपाठ रुग्णालयात दाखल होतच असून या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी रुग्णालयाच्या कानाकोपऱ्यात जिथे जागा मिळेल तिथे रुग्णांना बसवून त्यांना ऑक्सिजन लावले जात आहेत. 

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील खाटा मिळत नसून त्यांनाही शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील आणि पॅसेज मधील कठड्यावर बसवून ऑक्सिजन लावण्यात आले आहेत. रूग्णांचा उपचाराविना जीव जाण्याआधीच रुग्णालयीन व्यवस्था सुधारण्याची मागणी त्रस्त रुग्णाकडून केली जात आहे. यासंदर्भात केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

गरजेनुसार रुग्णावर  रुग्णालयात उपचार केले जात आहेत. आमची आणखी नवीन कोव्हिड केअर सुविधा लवकरच सुरू होईल. 
-  डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी, केडीएमसी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com