esakal | मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवा!
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : बिवलीतील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी केलेल्या अत्याचार प्रकरणात मुलीचो इन्स्टाग्राम (Instagram) आणि नंतर व्हॉट्सअपवरून (Whatsapp) मुलांशी ओळख झाल्याचे पुढे आले आहे तर दुसन्या घटनेत मोबाईलवर (Mobile) गेम खेळताना व इटावर झालेल्या ओळखोतून एका १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्याची घटना आहे.

हे पाहाता मुले मोबाईलचा ऑनलाईन गेम खेळताना कोणाच्या संपर्कात असतात. इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअवर त्यांचे कोण मित्र आहेत, यावर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. टिकटॉक बंद झाल्पावरवर तयार होणाऱ्या रोल सर्वांना वेड लावत आहेत. कोरोनात शाळा बंद असल्याने मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शिक्षणासाठी पालकांनी मुलांना स्वतंत्र फोन देखील घेऊन दिले आहेत. मात्र आपल्या पाठीमागे मुले मोबाईलमध्ये काम करतात, याकडेही पालकांनी लक्ष द्यायची वेळ आली आहे.

हेही वाचा: मुंबई-गोवा महामार्गाकडे शरद पवारांचं लक्ष;पाहा व्हिडिओ

लहान मुले ऑनलाईन गेम खेळताना पार्टनर म्हणून अनोळखी लोकांच्या संपर्कात येत आहेत. इन्स्टाग्रामवर तयार होणारे रोल त्याला येणारे लाईक यातूनही अनेक जण एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. घरातील ज्येष्ठ व्यक्तीही मोबाईलमध्ये सतत व्यस्त असल्याने आपली मुले कोणाशी बोलतात, मोबाईलमध्ये काय पाहतात हेही पालकांना माहीत नसते. त्यातूनच अशा अनेक घटना घडत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. यामुळे मुलांचा मोबाईल मोह आवरण्याची वेळ आता पालकांवर आली आहे.

हेही वाचा: अमरावतीत आणखी एक बालविवाह, वर-वधूच्या पालकांवर गुन्हा दाखल

डोंबिवलीत शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या बाबतीत घडलेली घटना, त्यातील मुलांची विकृती पाहता पहिल्यांदा डोक्यात हाच विचार आला की, माझा मुलगा मोबाईलमध्ये काय पाहात असतो, हे मी पाहिले पाहिजे. मुलांच्या हातात लवकर मोबाईल आल्याने त्याचे फायदे, तसेच तोटेही समोर येत आहेत. मात्र एक पालक म्हणून आता आपणच मुलांवर बारीक लक्ष ठेवावे.

- नम्रता धुरी, पालक

loading image
go to top