सलून आणि ब्युटी पार्लरचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा, AC सुरु असेल तरीही लागेल टाळं

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

सलून आणि ब्युटिपार्लर सुरु करताना हवा खेळती राहील यांची खबरदारी घेणे आवश्यक आहे. वातानुकूलीत यंत्र लावून दरवाजे खिडक्या बंद करु नये असे सक्त आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.

मुंबई : सलून आणि ब्युटिपार्लर सुरु करताना हवा खेळती राहील यांची खबरदारी घेणे आवश्यक आहे. वातानुकूलीत यंत्र लावून दरवाजे खिडक्या बंद करु नये असे सक्त आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. तसेच अपॉइंटमेंट घेऊनच ग्राहकांना प्रवेश देण्याचे आदेश प्रसिध्द करण्यात आले आहे. 

राज्य सरकारने सलून, ब्युटिपार्लर यांना व्यवसाय सुरु करण्याची सशर्त परवानगी दिली आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या नियमावलीच्या आधारे महापालिकेने मुंबईसाठी नियमावली तयार केली आहे.

मोठी बातमी - भारत बायोटेक कंपनीला मोठं यश, भारतात कोरोनाची पहिली लस तयार

यात सलून, ब्युटी पार्लरचे दरवाजे खिडक्या बंद असू नये असे सक्त आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबईत एसी शिवायच सलुन सुरु राहाणार आहेत. कर्मचार्याने ग्लोज, मास्क, ऍप्रन वापरणे बंधनकारक आहे. असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रसिध्द केलेल्या आदेशात नमुद आहे.

राज्य सरकारच्या नियमानुसार दाढी आणि त्वचेबाबत कोणतीही ट्रीटमेंट करता येणार नाही. केस कापणे व्हॅक्सिंग,केस रंगवणे अशी कामे करता येणार आहेत. तसेच टॉवल नॅपकिन डिस्पोजेबल वापरावे. तसे नसल्यास त्यांचे प्रत्येक सव्हिस नंतर निर्जंतुकीकरण करावे. तसेच खुर्चीचेही निर्जंतुकीकरण करण्यात यावे असेही या आदेशात नमुद आहे.

मोठी बातमी - 'लालबागच्या राजा'चा गणेशोत्सव रद्द, मंडळ जपणार सामाजिक भान 

स्थानिक पातळीवर निर्णय 

लॉकडाऊन शिथील करण्यात येत अअसला तरी स्थानिक पातळीवर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. सर्व प्रकारची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्थानिक प्रभाग पातळीवर सबंधित अधिकारी याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. प्रभाग पातळीवर लॉकडाऊनचे नियोजन करण्यात येणार आहे.

keep doors and windows open says BMC to salons and beauty parlors


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: keep doors and windows open says BMC to salons and beauty parlors