esakal | शवविच्छेदन केंद्र 24 तास सुरु ठेवा?, पालिकेचं पोलिसांना पत्र

बोलून बातमी शोधा

bmc

'शवविच्छेदन केंद्र 24 तास सुरु ठेवा', पालिकेचं पोलिसांना पत्र

sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: उपनगरातील चार रुग्णालयात असलेली शवविच्छेदन केंद्र 24 तास सुरु ठेवण्याबाबत महानगर पालिकेने पोलिस शल्य चिकित्सक विभागला पत्र पाठवले आहे, अशी माहिती महानगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. महानगर पालिकेच्या के.ई.एम, नायर आणि शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र हे त्या वैद्यकीय महाविद्यालयां मार्फत चालवली जातात.

उपनगरातील जुहू कूपर रुग्णालय, गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालय, बोरिवली भगवती रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र राज्य सरकारच्या जिल्हा पोलिस शल्य चिकीत्सक विभागा मार्फत चालवली जातात. त्यामुळे येथील शवविच्छेदन केंद्र 24 तास सुरु ठेवण्याचा अधिकार पोलिस विभागाचा आहे. त्याबाबत पोलिस शल्य चिकित्सक विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती महानगर पालिका प्रशासनाने आरोग्य समितीच्या पटलावर मांडली आहे.

हेही वाचा: हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात यश

राज्य सरकारच्या जे.जे.रुग्णालयासह शहर विभागातील महापालिकेच्या तिन्ही मुख्य रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र 24 तास सुरु असतात. विद्यमान आरोग्य समिती अध्यक्ष राजूल पटेल यांनी 2019 मध्ये आरोग्य समितीत याबाबत प्रस्ताव मांडला होता. उपनगरातील शवविच्छेदन केंद्रात संध्याकाळी 6 वाजल्यानंतर शवविच्छेदन केले जात नाही. मृत्यूची चौकशी होईपर्यंत अनेक वेळा संध्याकाळ होते. विशेषत: अपघाती मृत्यू, अचानक झालेले मृत्यू यात शवविच्छेदन करावे लागते.

हेही वाचा: 'या' दोन विभागातील रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यांच्या वर

अशा मृत्यूमुळे मृतांच्या नातेवाईकांना धक्का बसलेला असतो. त्यात संध्याकाळी 6 नंतर शवविच्छेदन होत नसल्याने दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत वाट पाहावी लागते. अशा प्रसंगी प्रतिक्षा करणे असह्य असते. त्यामुळे उपनगरातील शवविच्छेदन केंद्रही 24 तास सुरु ठेवावे अशी मागणी पटेल यांनी केली होती. या प्रस्तावावर प्रशासनाकडून ही माहिती सादर करण्यात आली आहे.

(संपादन- पूजा विचारे)

keep the autopsy center open 24 hours letter of bmc to mumbai police