‘केम’प्रकरणी प्रकल्प अधिकारी निलंबित

Ram-Shinde
Ram-Shinde

मुंबई - विदर्भातील सात जिल्ह्यांतील कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पात (केम) झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना निलंबित केल्याची घोषणा पणनमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत केली. 

विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम आणि वर्धा आदी जिल्ह्यींतील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना व प्रत्यक्ष लाभ स्वरूपात या कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्प (केम) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पावर १०८ कोटी खर्च झाले. या आत्महत्याग्रस्त सात जिल्ह्यांत राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या विविध कामांत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले होते. या प्रकल्पात सुमारे दहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. 

या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीत काय आढळून आले आहे आणि चौकशीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई केली, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर केमचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांचे निलंबन केल्याची घोषणा मंत्री राम शिंदे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com