esakal | बाप रे! 'या' बाबतीत मुंबई केरळच्या एक महिना मागे; कोरोनाला रोखण्यासाठी केरळनं केली होती पूर्वतयारी..
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोविड कोरोनाची भारतात चर्चा सुरु असताना केरळ राज्याने या आजाराला प्रतिबंध करण्याची तयारी सुरु केली आहे.कोविडसाठी 24 जानेवारी रोजी हेल्पलाईन सुरु करण्यात आली होती तर फेब्रुवारीच्या पहिल्या 15 दिवसा पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात 2 या प्रमाणे 28 कोविड रुग्णालयांची तयारी सुरु केली होती.

बाप रे! 'या' बाबतीत मुंबई केरळच्या एक महिना मागे; कोरोनाला रोखण्यासाठी केरळनं केली होती पूर्वतयारी..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई :कोविड कोरोनाची भारतात चर्चा सुरु असताना केरळ राज्याने या आजाराला प्रतिबंध करण्याची तयारी सुरु केली आहे.कोविडसाठी 24 जानेवारी रोजी हेल्पलाईन सुरु करण्यात आली होती तर फेब्रुवारीच्या पहिल्या 15 दिवसा पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात 2 या प्रमाणे 28 कोविड रुग्णालयांची तयारी सुरु केली होती.

प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाईन केल्यामुळे राज्यातील सामाजिक संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा दावा करण्यात येत आहे.एवढेच काय लॉकडाऊन नंतर परीस्थीती कशी हाताळाची याची तयारीही केरळने सुरु केली असून साधारण 3 लाखहून अधिक केरळवासीय परदेशातून येण्याचा अंदाज तयार करण्यात आला आहे.

केरळचे कोविड कोरोनासाथ नियंत्रणांचे नोडल ऑफिसर डॉ.राजन यांनी सकाळशी संवाद साधला.या संवादात त्यांनी केरळ पॅटर्न राबविण्यास 24 जानेवारी पासूनच सुरुवात केल्याचे सांगितले. 30 जानेवारी रोजी केरळात पहिला कोविड रुग्ण आढळला होता. हा तरुण चिनच्या वुहान प्रांतातून आला होता. त्यापुर्वीच विमानतळावर काही देशातील प्रवाशांची तपासणी सुरु करण्यात आली होती.हा प्रवासी क्वारंटाईन मधील होता.सुरवातील चिन आणि त्याच्या शेजारील राष्ट्रामधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात होती.केंद्र सरकारचे मागदर्शक सुचनां बरोबर जागतिक आरोग्य संघटनेकडून रोज जाहीर केल्या जाणाऱ्या अहवाला नुसार कार्यपध्दती ठरवली जात होती.

हेही वाचा: शाळा सुरु झाल्यानंतर काय? मुख्यमंत्र्यांनी दिल्यात 'या' महत्त्वाच्या सुचना...

फेब्रुवारीच्या पहिल्या 15 दिवसातच जास्तीत जास्त देशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन केले जात होत असे डॉ.राजन यांनी सांगितले. केरळ राज्याने कोविड रुग्णांसाठी रुग्णालय तयार केल होते तेव्हा महाराष्ट्रातील मुंबई मध्ये कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यातील नायडू रुग्णालयात कक्ष तयार करण्यात आले होते.

कोविडसाठी केरळ सरकारने तीन पातळ्यावर काम केले.पाहिली पातळीची सुरवात फेब्रुवारी महिन्याच्या सुरवाती पासूनच करण्यता आली.यात विमानतळावर तपासणी करण्या बरोबर प्रवाशांना क्वारंटाईन करणे.त्यासाठी विलगीकरण केंद्र तयार करण्या बरोबर हॉटेल मध्ये पेड क्वारंटाईनचीही सोय करण्यात आली होती.तसेच,प्रवाशांना घरातही एकांतात राहाण्यची मुभा होती.एप्रिल पर्यंत क्वारंटाईन मध्ये 1 लाखहून अधिक व्यक्ती होत्या.त्यात,परदेशातून आलेले प्रवासी तर होतच पण परराज्यांमधून आलेले प्रवासी तसेच काही हायरिस्क कॉन्डक्‍टही होते.असेही डॉ.राजन सांगतात.

संपुर्ण देशात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशी प्रवाशांची तपासणी केली जात असताना केरळने मार्च महिन्या पासून देशातंर्गत प्रवाशांचीही तपासणी करण्यास सुरवात केली होती.तर,महाराष्ट्रातच काय देशातील इतर कोणत्या राज्यात अशा प्रकारे देशांतर्गत प्रवाशांची तपासणी करण्यात येत नव्हती.केरळने राज्याच्या सर्व सिमांवर तसेच रेल्वे स्थानकांवर चेक पोस्ट उभारल्या होत्या.

महाराष्ट्रातला पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्च रोजी आढळला.हा प्रवासी दुबईहून आला होता.तर,मुंबईत आढळलेले पहिले दोन रुग्णही दुबईहून आले होते.त्यामुळे 10 मार्च नंतर राज्य सरकारने दुबईहून येणाऱ्या प्रवाशांच्या विमानतळावरील तपासणीसाठी परवानगी मागितली होती.तर,केरळने महिना भरा पुर्वीच तपासणी सुरु केली होती.

हेही वाचा: विमानसेवा सुरु झाली अन् अनेकांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला...

केरळ पॅटर्नची चर्चा जगभरात सुरु आहे.चिन मधिल वुहान मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागतातच केरळने तेथील परीस्थीतीवर लक्ष ठेवण्यास सुरवात केले होते.केरळचे आता पर्यंत भारताच्या एक महिना पुढचे नियोजन केले आहे.तर,ताळेबंदी पुर्वी पर्यंत देशातंर्गत प्रवाशाची तपासणी केली जात नव्हती.फक्त काही दिवस पुर्वी पर्यंत विमानतळावर आंतरदेशीय प्रवासांची तपासणी सुरु केली होती.


क्वारंटाईन व्यक्तीच्या घरात जाऊन विचारणा:

केरळ राज्याने सुरवाती पासून क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींच्या घरात जाऊन विचार पुस करण्याचा नियम तयार केल होता.क्वारंटाईन व्यक्तीच्या घरात नियमीत पोहचण्याचा प्रयत्न वैद्यकिय कर्मचारी करत होते.त्यांना इतर सरकारी विभागाकडून मदत होत होती.त्यामुळे विलगीकरणात असलेली व्यक्ती इतरांमध्ये मिसळण्यास कमी वाव होता.संपुर्ण देशात सुरवाती पासून 14 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी होता तर केरळ मध्ये 28 दिवसांपासून सुरवात करण्यता आली होती.आता हा कालावधी 14 दिवसांवर आणण्यात आला आहे.असे डॉ.राजन यांनी सांगितले.

राज्यात सामाजिक संसर्ग कमी: 

क्वारंटाईन मध्ये असलेल्या व्यक्तींवर देखरेख ठेवण्यात येत असल्याने राज्यात कोविडचा सामाजिक संसर्ग अत्यंत कमी प्रमाणात असल्याचे डॉ.राजन यांनी सांगितले.70 ते 75 रुग्ण हे परदेशातून अथवा इतर राज्यातून आलेले आहेत.तर,20 ते 25 टक्के रुग्ण हे त्यांच्या संपर्कातील होते.तर,अत्याल्प प्रमाणातील रुग्ण हे सामाजिक संसर्गातील असतील असेही डॉ.राजन नमुद करतात.तर,मुंबईत 10 ते 12 टक्के रुग्णांचा परदेश प्रवासाचा इतिहार आहे.

तीन लाखांची तयारी:

जगभरात ताळेबंदी उठविण्याची चर्चा सुरु झालेली असतानाच केरळ पुढील तयारी सुरु केली आहे.परदेशातून केरळ मध्ये येण्यास इच्छूक असलेल्या प्रवाशांची माहिती घेण्यासाठी संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.त्यावर आता पर्यंत 3 लाखहून अधिक व्यक्तींनी नोंदणी केली आहे.यामुळे पुढील तयारी करता येईल असेही डॉ.राजन सांगतात.ही केरळच्या नियोजनाची तिसरी पातळी आहे.सध्या 99 हजार क्वारंटाईन आहेत.

दिलासादायक : मुंबईत अनेक दिवसांनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत 'घट', मात्र भीती कायम

चालकांनाही क्वारंटाईन:

विमानतळावरुन घरी जाण्यासाठी प्रवाशांना सरकारी बस सेवा सुरवाती पासूनच उपलब्ध करुन दिली होती.जर,एखादा प्रवासी टॅक्‍सी किंवा खासगी वाहानांने विमानतळ ते घर असा प्रवास करणार असेल तर त्या वाहानांचा चालकही क्वारंटाईन होईल याची खबरदारी घेतली जात होती.उलट महाराष्ट्रातील पहिला संसर्ग हा टॅक्‍सी चालकाला झाला होता.पुण्यातील पहिल्या रुग्णांना या चालकाने घरी सोडले होते.त्यानंतर त्याच्या टॅक्‍सीतून इतर प्रवाशांनीही प्रवास केला होता. 

keral firstly started prepartion about corona mumbai started after one month 

loading image