esakal | पालघर मध्ये केवडा होतोय दुर्मिळ ; गणेश उत्सवात असते जास्त मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पालघर मध्ये केवडा होतोय दुर्मिळ ; गणेश उत्सवात असते जास्त मागणी

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर किंवा केतकीच्या बनात नागीण सळसळली हि गाणी आपल्या मनी आजही रुणझुणत असतानाच हि केतकीच म्हणजेच केवढा (Kevadha) याला वर्षभर कोणी विचारत नसले तरी गणपती (Ganpati) मध्ये मात्र याचा भाव वधारलेला असतो. काल पासून याचा भाव वाढला असून जी  पाती  १० रुपयाला मिळते तीच पाती  चक्क ५०० रुपयेही कमवून देऊ लागली आहे. कारण गणपतीच्या (Ganpati) पूजेला याचे अनन्यसाधारण महत्व आहे . परंतु दुर्मिळ असा केवढा आता दुर्मिळ होऊ लागला आहे. 

गणेशोत्सवात जसा दुर्वा ,जास्वंद या फुलांना मान असतो तसाच मान हा केवड्याला पण असतो . गणेश,गौरी पूजनासाठी लागणारा केवड़ा दुर्मिल झाल्याने पूजे साठी लागणार्या केवड्या वीना  मुर्त्यांची विधिवत पूजा करावी लागणार आहे. त्यामुळे भाविका नाराज झाले आहेत. पश्चिम किनार्यावरील कोरे,एडवन ,केळवा,माहीम,चिंचणी बोर्डी आणि विक्रमगड तालुक्यातील काही भागात नैसर्गिकरित्या उगवलेला केवडा मिळत आहे. परंतु आता धूपप्रतिबंधित असलेली हि झाडे कापून टाकल्याने कमी होऊ लागली आहेत.केवड्याला अत्तरासाठीही मोठी मागणी असते. 

Mumbai

Mumbai

हेही वाचा: हिंदूच्या भावना पुन्हा दुखावल्या; आता 'रेड लेबल' टार्गेट

हिंदूच्या धार्मिक कार्यात देव-देवतांच्या पूजेला महत्वाचे स्थान आहे. परंपरेनुसार प्रत्येक देवाला विशिष्ट प्रकारची पाने, व फुले वाहण्याची प्रथा आहे. गणपतीला दुर्वा, जास्वंदी फूल, केवडा वाहिला जातो. तर गौरीला मोगर्याची फणी, गजरा, केवड़ा वाहिला जातो. गणेशोत्सव व गौरीचा सण सुरु होणार आहे. मात्र केवड़ा मिळत नसल्याने केवडयावीणा गौरी-गणपतीची पूजा करावी लागणाऱ असल्याने भाविक नाराज झाले आहेत. 

loading image
go to top