खानदेश महोत्सवास कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

कल्याण - कल्याण उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या पहिल्यावहिल्या खानदेश महोत्सवास नागरिकांनी प्रतिसाद दिला. खानदेशी खाद्य संस्कृती तसेच तेथील विविध परंपरांचा नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला. कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन झाले.

लोकवान, सिहोर या वाणाचे गहू, हाताने तयार केलेल्या गव्हाच्या शेवया, पाऊंड, रंगीत कुरडया, शंकरपाळे, खानदेशी पुरणपोळी अर्थात मांडा असे विविध चवीच्या पदार्थांची चव चाखून तृप्तीचा ढेकर देतच खवय्ये बाहेर पडले. कळणाची भाकरी आणि वांग्याचे भरीत महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. कल्याण परिसरातील खानदेशी नागरिकांनी मोठ्या संख्येने महोत्सवाला हजेरी लावली. याव्यतिरिक्त मूळच्या खानदेशी नागरिकांनी सुरू केलेल्या विविध व्यवसायांची माहिती देणारे स्टॉल्स येथे आहेत. खानदेशातील प्रसिद्ध गहू खरेदी करण्यासाठीही चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. खानदेशी लोकसंगीत, अहिराणी भाषेतील गाणीही या ठिकाणी सादर करण्यात आली. आमदार नरेंद्र पवार, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर मोरेश्‍वर भोईर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या महोत्सवाच्या आयोजनासाठी विकास पाटील, ए. जी. पाटील, दीपक महाजन, दीपक पाटील, एन. एम. भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: khandesh mahostav spontaneous response