Navi Mumbai News: खारघरवासियांनी अंधारातच काढली रात्र, १८ तासांपासून वीज गायब; सिडकोचे नागरिकांना 'हे' महत्वाचे आवाहन

kharghar Power Supply : सदर काम खूप अवघड असुन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहे. वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यात येईल तरी सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे असे महावितरणकडून आवाहन करण्यात आले आहे.
Kharghar's main power supply line gutted in a late-night fire, leaving thousands of residents without electricity.
Kharghar's main power supply line gutted in a late-night fire, leaving thousands of residents without electricity. esakal
Updated on

नवी मुंबईतील खारघरमधील नागरिकांना मंगळवारची रात्र अंधारात काढावी लागली आहे. असून मंगळवारी दुपारपासून वीज नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली असून मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. खारघर सेक्टर १२ मधून सेक्टर ३० ते ३६ परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वीजवाहिनीत बिघाड होऊन आगीत जळून खाक झाली आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com