सिडकोच्या घरांसाठी चतुर्थीचा मुहूर्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

खारघर - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी सिडकोच्या बहुप्रतीक्षित 15 हजार घरांच्या गृहप्रकल्पाचे काम लांबणीवर पडले आहे. सिडकोच्या नव्या घरांची लॉटरी मेपर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते; मात्र आपल्या हक्काच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांना गणेश उत्सवापर्यंत वाट पाहावी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नवी मुंबईत विविध आर्थिक दुर्बल घटकांसाठी पुढील पाच वर्षांत 55 हजार घरे बांधण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. गेल्या चार वर्षांत आतापर्यंत पाच हजार घरांची निर्मिती झाली. त्यात अल्प व अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी 15 हजार 152 घरांच्या प्रकल्पाचे नियोजन पूर्ण झाले. 

घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा व द्रोणागिरी या नोडमध्ये ही घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. 

सिडकोच्या गृहप्रकल्पांची कामे केलेल्या बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्‍शन या कंपनीला या नव्या गृहप्रकल्पाच्या उभारणीचेही कंत्राट मिळाले आहे. तळोजातील नियोजित गृहप्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे बांधकाम प्रक्रिया लांबणीवर पडली होती; मात्र नुकतीच ही मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घरांची अंदाजित किंमतही निश्‍चित केल्याचेही सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली असती तर मे महिन्यापर्यंत लॉटरीसाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असती; मात्र यासाठी गणेश चतुर्थीपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे कळते. 

तळोजा येथील गृहप्रकल्पास पर्यावरणाची मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. 
- मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी सिडको 

Web Title: kharghar's CIDCO's houses