new flyover in Thane traffic benefits
esakal
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खारेगाव खाडी पुलावरील एक प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. खारेगाव खाडी पूल येथील नव्याने (Kharigaon Creek flyover traffic update) उभारण्यात आलेला उड्डाणपूल बुधवार (ता. २९)पासून जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे मुंबई, ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.