आवक घटल्याने चिंबोऱ्या महागल्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

रोहा : गुलाबी थंडीचे दिवस संपत आले असून उन्हाळ्याचा दाह सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खाडीतील काळ्या चिंबोऱ्यांची आवक घटली असून त्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. गेल्या आठवड्यात लहान आकाराच्या पाच; तर मध्यम आकाराच्या दोन चिंबोऱ्या 100 रुपयांना विकल्या गेल्या होत्या; तर मोठी चिंबोरी 400 रुपये प्रति किलोने विकली गेली होती. बाजारपेठेत रविवारी चिंबोऱ्यांची दुप्पट भाववाढ होऊन लहान आकाराच्या 5 तसेच मध्यम आकाराच्या दोन चिंबोऱ्यांची किंमत 200 रुपये झाली होती. मोठी चिंबोरी 800 रुपये प्रतिकिलोने विकली जात होती.

रोहा : गुलाबी थंडीचे दिवस संपत आले असून उन्हाळ्याचा दाह सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खाडीतील काळ्या चिंबोऱ्यांची आवक घटली असून त्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. गेल्या आठवड्यात लहान आकाराच्या पाच; तर मध्यम आकाराच्या दोन चिंबोऱ्या 100 रुपयांना विकल्या गेल्या होत्या; तर मोठी चिंबोरी 400 रुपये प्रति किलोने विकली गेली होती. बाजारपेठेत रविवारी चिंबोऱ्यांची दुप्पट भाववाढ होऊन लहान आकाराच्या 5 तसेच मध्यम आकाराच्या दोन चिंबोऱ्यांची किंमत 200 रुपये झाली होती. मोठी चिंबोरी 800 रुपये प्रतिकिलोने विकली जात होती. चिंबोऱ्यांच्या किमतीत दुपटीने भाववाढ झाली असली तरीही ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.

मोठी बातमी : ... भाजपची एकहाती सत्ता येईल! 

हिवाळ्यात खाडीकिनारी चिंबोऱ्या मोठ्या प्रमाणावर मिळतात. मात्र उष्णता वाढू लागताच चिंबोऱ्यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बाजारात चिंबोऱ्यांची आवक घटली आहे. माघ महिना सुरू असून खवय्यांना कोणत्याही व्रतवैकल्याचा अडथळा नाही. त्यामुळे बाजारात चिंबोऱ्यांची मागणी वाढली आहे. आवक घटली असूनही मागणी वाढल्याने चिंबोऱ्यांचा भाव दुपटीने वधारला आहे.

उरण, पेण, अलिबाग, म्हसळा, दिघी या परिसरातून चिंबोऱ्या बाजारात विक्रीसाठी येत आहेत. कॅल्शियमचा चांगला स्रोत असलेल्या चिंबोऱ्या चवीला छान असल्याने खवय्यांची कायम पहिली पसंती असते. चिंबोऱ्या खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. शरीरात उष्णता निर्माण करणाऱ्या चिंबोऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांत पचायला जड जातात. मात्र हिवाळ्यात चिंबोऱ्या आरोग्यास लाभदायक असतात.

हेही वाचा : शिलाहार राजवटीच्‍या पाउलखुणा पुसट 

हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याच्या मार्गावर असल्याने चिंबोऱ्यांची आवक घटली आहे. तरीही मागणी वाढल्याने चिंबोऱ्यांचा भाव दुपटीने वाढला आहे. 
- दिनेश वाडकर, विक्रेते, अलिबाग 

चिंबोऱ्यांची आवक घटली आहे. मात्र दर्जा चांगला आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने भाव चांगला मिळत आहे. 
- वनिता चोडनेकर, विक्रेत्या, कोलाड. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khaviyyono-got-expensive