esakal | चिखल लावलेल्या नंबर प्लेटमुळे अपहरणकर्ते जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

चिखल लावलेल्या नंबर प्लेटमुळे अपहरणकर्ते जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खोपोली : खोपोली (Khopoli) पोलिस (Police) ठाणे अंतर्गत शीळफाटा येथे गस्तीवरील पोलिसांनी एका चारचाकी वाहनाविषयी संशय आल्याने त्यातील व्यक्तींची चौकशी केली. त्यात सहा जणांपैकी एकाचे अपहरण करण्यात आल्याचे उघड झाले. पाच जणांनी मिळून हे कृत्य केले होते व त्याच्याकडे खंडणी मागितल्याचे उघड झाले.

पोलिसांनी तातडीने पाच जणांना अटक करून अपहृत व्यक्तीची सुटका केली. गुरुवारी (ता. ३०) रात्री खोपोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर, अंमलदार स्वागत तांबे, राम मासाळ हे गस्तीवर होते. त्याच वेळी एका कारच्या मागील बाजूच्या नंबरप्लेटवर चिखल लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत संशय आल्याने पोलिसांनी आतील व्यक्तींची चौकशी केली असता कारमधील पाच जणांनी मिळून एका व्यक्तीचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले.

अपहृत व्यक्तीने मला वाचवा, असे ओरडल्याने पोलिसांनी सर्वांना कारमधून खाली उतरवले. पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी सुरू केली असता आरोपींनी गुन्हा कबूल केला. याप्रकरणी वामन मारुती शिंदे (वय ३९), योगेंद्र प्रसाद (२५), दिलीप पासवान (३२), धुरपचंद्र यादव ३३), संदीप सोनावणे (३५) यांना पोलिसांनी अटक केली. हे सर्वजण अंबरनाथमध्ये राहणारे आहेत. या पाच जणांनी मिळून पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील दिगंबर इंदलसिंग चितोडिया यांचे अपहरण करून त्याला दोन दिवस अंबरनाथमधील एका अज्ञात स्थळी डांबून ठेवले होते.

हेही वाचा: मुंबई : लोकलमधून बॅग चोरी करणारा सराईत गुन्हेगार अटकेत

सुटका करायची झाल्यास २५ लाख रुपये आणून देण्याची मागणी चितोडिया बाकडे केल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपासात पुण्यातील हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

loading image
go to top