हत्या-अपहरणच्या आरोपातील फाशीची शिक्षा हायकोर्टकडून रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

सात वर्षापूर्वी बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण आणि हत्या केल्याच्या आरोपात मुंबई सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची सजा मुंबई हायकोर्टने रद्दबातल केली.

मुंबई : सात वर्षापूर्वी बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण आणि हत्या केल्याच्या आरोपात मुंबई सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची सजा मुंबई हायकोर्टने रद्दबातल केली. अन्य आरोपी आझाद अन्सारीची जन्मठेपेची सजाही सबळ पुराव्याअभावी रद्द करण्याचे आदेश दिले. आरोपी इम्तियाज शेखला (28) फाशीची सजा सुनावण्यात आली होती. शेख ज्या ठिकाणी काम करीत होता त्याच्या मालकाने त्याला कामावरून कमी केले होते. याचा राग ठेऊन दोन्ही आरोपींनी गुन्हा केला असा अभियोग पक्षाचा आरोप होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kidnapping and murder case accused death sentence cancelled by bombay high court