Dombivali Crime : पत्नी-मुलाच्या ताब्यासाठी जावयाकडून सासूचे अपहरण; दोघांना अटक

पती सोबत भांडण होत असल्याने ते कल्याण येथील माहेरी आपल्या आईच्या घरी मुलासह निघून आली होती.
Crime
Crimesakal

डोंबिवली - पती सोबत भांडण होत असल्याने ते कल्याण येथील माहेरी आपल्या आईच्या घरी मुलासह निघून आली होती. काही दिवसांनी पती बायको मुलाला घेऊन जाण्यासाठी आला. त्यास सासूने नकार दिल्याने जावयाने कल्याण पूर्वेतून सासूचे अपहरण केले.

तिला तळोजा परिसरात डांबून ठेवले, इतकेच नव्हे तर रागाच्या भरात सासूला लोखंडी रॉड व कैचीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जावई भावेश मढवी व त्याचा मित्र सुरज म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

भावेश हा तळोजा परिसरात राहण्यास आहे. त्याचे लग्न कल्याण पूर्वेत राहत असलेल्या दीक्षिता खोकरे हिच्या बरोबर झाल आहे. त्यांना एक मुलगा आहे. काही महिन्यांपासून दीक्षित आणि पती भावेश यांच्यात कौटुंबिक कारणातून भांडणे होत होती. भांडणाला कंटाळुन ती कल्याण मधील आपल्या आईच्या घरी आली होती.

पत्नी व मुलाला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी जावई भावेश आणि त्याचा मित्र सूरज म्हात्रे वाहन कल्याण पूर्वेतील अमरदीप वसाहत भागात आले. घरात आल्यानंतर भावेशने पत्नी कुठे आणि मुलाला कोणाला विकले का, असे रागाच्या भरात प्रश्न केले. तुम्ही माझ्या पत्नी, मुलाचे काही तरी वाईट केले आहे असा आरोप करत भावेशने सासू दीपालीला चाकुचा धाक दाखविला.

आम्ही तुम्हाला आता पोलीस ठाण्यात नेतो. पोलीस ठाण्यात नेण्याचे खोटे कारण देत भावेश, सूरजने सासूला जबरदस्तीने स्वताच्या वाहनात बसविले. स्वताच्या तळोजा येथील घरी नेऊन डांबून ठेवले. तेथे तिला लोखंडी सळई, कात्रीने मारहाण करण्यात आल

आई कुठे गेली म्हणून दीक्षिता आईचा शोध घेत होती. तिला पती भावेशचा फोन आला. आई माझ्या ताब्यात आहे. तू मुलाला माझ्या ताब्यात दे, असे सांगितले. दीक्षिताने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीय मानपाडा पोलिसांना घेऊन तळोजा येथे पोहचले. तेथे दीपाली जखमी अवस्थेत आढळून आली.

पोलिसांनी सासू दीपालीची भावेशच्या ताब्यातून सोडवणूक केली. भावेश, सुरजला तात्काळ अटक केली. मानपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुध्द अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com