महिलांनो लोकल प्रवासादरम्यान मुलांना सोबत नेऊ नका, स्टेशनवरून परत पाठवण्यात येईल

सुमित बागुल
Friday, 27 November 2020

लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांची पुरती दैना उडालीय. अशात मुंबईकरांसाठी प्रवासाचं सर्वात जास्त वापरलं जाणारं साधन म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन.

मुंबई : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांची पुरती दैना उडालीय. अशात मुंबईकरांसाठी प्रवासाचं सर्वात जास्त वापरलं जाणारं साधन म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन. राज्यात आणि मुंबईत अनलॉक सुरु झाला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्यानंतर महिला, सेक्युरिटी गार्डस तसेच वकील यांना मुंबई लोकलमधून प्रवासास करण्यास परवानगी देण्यात आली. अशात काही महिलांकडून लोकलने त्यांच्या पाल्याना घेऊन जाण्याचे प्रकार घडतायत. गेल्या काही दिवसात महिलांकडून रेल्वेने त्यांच्या मुलांना सोबत घेऊन प्रवास करण्याचे प्रकार वाढलेले पाहायला मिळतायत. अशात, रेल्वे विभागाने महिलांसोबत मुलांनी प्रवास करण्यावर मनाई केली आहे. 

महत्त्वाची बातमी : अधिक काळजी घ्या, मुंबईत गुजरात आणि राजस्थानमधून आलेल्या रुग्णांची संख्या वाढतेय

एकीकडे कोरोनाचे आकडे पुन्हा वाढताना पाहायला मिळतायत. अशात राज्यात आणि विशेषकरून मुंबईसारख्या राजधानीच्या शहरात पुन्हा कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात. या परिस्थितीत महिलांनी मुलांना घेऊन लोकलने प्रवास करणे धोकादायक असल्याने रेल्वेने एक परिपत्रक जारी करत महिलांसोबत मुलांनी प्रवास करण्यावर मज्जाव केलाय. दरम्यान, कुणीही महिला आपल्या मुलासोबत रेल्वे स्टेशनवर आढळून आली किंवा तसा प्रयत्न करत असेल तर त्यांना परत पाठवलं जाईल असंही रेल्वेकडून सांगितलं गेलं आहे. 

महत्त्वाची बातमी :  ED ने तयार केला कोठडी अहवाल, प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढणार ?

मुंबईतील लोकल म्हणजे मुंबईची लाईफ लाईन. अशात मुंबईतील लोकल ट्रेन्स या सर्वांसाठी सध्यातरी सुरु करण्यात येणार नसल्याचं मुंबईचे महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील स्पष्ट केलंय. लोकलमध्ये होणारी गर्दी कोरोना रुग्णसंख्या  पुन्हा वाढवू शकते त्यामुळे खबरदारी म्हणून डिसेंबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत तरी मुंबईतील लोकल ट्रेन्स सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहेत.

kids are not allowed to travel with their mother or aunts from mumbi local trains


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kids are not allowed to travel with their mother or aunts from mumbi local trains