दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू 

File Photo
File Photo

नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भरधाव दुचाकी (एम एच 4 एफ बी 5552) घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. प्रतीक विक्रम कोटियान असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी आहे.

रविवारी (ता. 17) सकाळी 7 मित्र मिळून चारोटी येथे सहलीसाठी जात होते. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गुजरातच्या दिशेने जात असतानाच विरारमधील भालीवली गावाच्या हद्दीत असलेल्या खनिवडे टोल नाक्‍यानजीक प्रतीकची दुचाकी घसरून अपघात झाला. यात प्रतीकच्या छातीला व हातपायाला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत विरार पोलिस ठाण्यात नोंद करून अधिक तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com