भाजप नेते किरीट सोमय्या आणि पत्नी मेधा सोमय्या कोरोना पॉझिटिव्ह

समीर सुर्वे
Monday, 10 August 2020

सोमय्या हे मुलूंड येथे राहतात. हा भाग जूलै महिन्यात कोव्हिड हॉटस्पॉट होता. मात्र,आता या भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आले आहे.

मुंबई :  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सोमय्या यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. 

नक्की वाचा : कोरोनाचा 'आरटीओ'लाही फटका; महसूल घटल्याने 'या' वाहनधारकांकडे वळवणार मोर्चा

पत्नीसह स्वत:वर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये लिहीलय. मात्र, यात रुग्णालयाचे नाव नमुद नाही. 

हे ही वाचा : ...तर खासगी डॉक्टरांवर कारवाई, केडीएमसी आयुक्तांचा इशारा

सोमय्या हे मुलूंड येथे राहतात. हा भाग जूलै महिन्यात कोव्हिड हॉटस्पॉट होता. मात्र,आता या भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आले आहे. सोमय्या हे सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णांना योग्य प्रमाणात सुविधा मिळतात की नाही याची पाहणी करण्यासाठी अनेक रुग्णालयात फिरत असत.

kirit somaiya and his wife corona positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kirit somaiya and his wife corona positive