रश्मी ठाकरेंचे बंगले गेले कुठे? CBI चौकशीसाठी मोदींकडे विनंती करणार - सोमय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

संजय राऊत यांना रश्मी ठाकरे यांच्याविषयी इतकी खुन्नस का आहे?, सोमय्यांचा सवाल

'रश्मी ठाकरेंचे बंगले गेले कुठे? CBI चौकशीसाठी मोदींकडे विनंती करणार'

सध्या राज्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव (Rashmi Thackeray) ठाकरे यांच्यावर १९ बंगला या प्रकरणावरून आरोप केले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांच्यासाठी 19 बंगले विकत घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शिवसेनेचा गद्दार सरपंच बंगले नाहीत अस म्हणत असेल तर त्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somiya) मैदानात उभा आहे. रश्मी ठाकरेंचे बंगले कुठे गेले याविषयी सीबीआय चौकशीसाठी मोदींकडे (PM Modi) विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: LIVE : किरीट सोमय्यांचा कोर्लई दौरा; 'स्वागता'ला शिवसैनिक तयार

यावेळी ते म्हणाले, बंगले गायब झाले की नाही याची चौकशी व्हायला हवी. हे बंगले गेले कुठे? उद्धव ठाकरे माफिया सरकार चालवत असून त्यांनी कोविडमध्येही भ्रष्टाचार केला आहे. रश्मी उद्धव ठाकरे यांचे बंगले शोधण्यासाठी सीबीआय चौकशी करायला हवी, यासाठी मी पंतप्रधान मोदींना विनंती करणार असल्याचेही त्यांना यावेळी सांगितले.

पुढे ते म्हणाले, ग्रामसेवक, तलाठी हे त्यांचे काम करत असतात. जानेवरी 2019 मध्ये रश्मी ठाकरे यांनी बंगले माझ्या नावावर झाले नाहीत असे पत्र लिहिले होते. तातडीने 2020 मध्ये हे बंगले त्यांच्या नावावर झाले. संजय राऊत यांना रश्मी ठाकरे यांच्याविषयी इतकी खुन्नस का आहे? एवढ्या मोठ्या पत्रकार परिषदेत रश्मी ठाकरे 19 बंगल्याबाबत ते बोलले नाहीत. किरीट सोमय्या रश्मी ठाकरे यांना बंगले मिळावे यासाठी लढत आहेत. ध्येय वेड्या माणसाचा इलाज करण्याची गोष्ट माफियागिरीवाले करत आहेत असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

हेही वाचा: राज्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव?, मंत्री सुनील केदार म्हणाले..

Web Title: Kirit Somaiya Reaction 19 Bangla Rashmi Thackeray Cbi Inquiry To Pm Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top