
Kirit Somaiya | 'चार इंच वर दगड लागला असता तर मी आंधळा झालो असतो'
भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना समोर आली. यानंतर मुंबईत रात्रभर मोठं राजकीय नाट्य रंगलं. किरीट सोमय्यांनी गाडीतून उतरण्यास नकार दिला. (Kirit Somaiya Attacked in Mumbai)
पोलिसांनी त्यांना विनंती केल्यानंतर सोमय्यांनी एफआयआर दाखल केली. मात्र, पोलिसांनी खोटी माहिती लिहून घेतल्याचं सांगितलं. तर, सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केला. आणि आता एकमेकांविरोधात तक्रार दिलीय. यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर आणि पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. हा मला मारण्याचा कट होता असं ते म्हणाले.
हेही वाचा: शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर हल्ला, झेड सुरक्षेतून दगड थेट गाडीत
माझ्यावर झालेला हल्ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केलेलं षडयंत्र आहे. आधी पोलीस सिक्युरिटी असल्याचं सांगितलं. त्यानंतर मला सात-आठ पोलिसांनी शिवसैनिकांच्या हवाली केलं. या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. मला आंधळं करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा होता. चार इंच वर दगड लागला असता तर मी आंधळा झालो असतो, असं सोमय्यांनी म्हटलंय.
हेही वाचा: माझ्यावरील हल्ल्यासाठी ठाकरे सरकारच स्पॉन्सर, सोमय्यांचा आरोप
ठाकरे सरकार गुंडगिरी करतात माफिया गिरी करयात घोटाळे करतात
ठाकरे साहेब उत्तर द्या काल fir का घेतली नाही
भारतीय जनता पक्ष गेली बारा वर्ष सर्व प्रकारचे घोटाळे बाहेर काढत आहे
काल माझ्या वर जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केले हल्ला होता
मी पोचण्या पूर्वी 70 ते 80 शिवसेनिकांची व्यवस्था केली होती
मला शिवीगाळ करत माझ्यावर हल्ला
70 ते 80 शिवसेनीक माझ्या वर
या सर्वला संजय पांडे जबाबदार आहेत
ठाकरे सरकारची काम करण्याची क्षमता संपली आहे
Web Title: Kirit Somaiyya Alleges Shivsena And Mumbai Cp Sanjay Pande After Attack In Khar Of Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..