आंबेगाव येथे कृषी विभागातर्फे किसान कल्याण संमेलन    

मुरलीधर दळवी
गुरुवार, 3 मे 2018

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेंतर्गत कृषी विभागातर्फे मुरबाड तालुक्यातील आंबेगाव येथे बुधवारी किसान कल्याण संमेलन आयोजित करण्यात आले. 

मुरबाड (ठाणे) : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेंतर्गत कृषी विभागातर्फे मुरबाड तालुक्यातील आंबेगाव येथे बुधवारी किसान कल्याण संमेलन आयोजित करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य उल्हास बांगर यांचे हस्ते करण्यात आले.  

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य श्रीमती धनगर आंबेगावचे सरपंच अरुण घरत उपस्थित होते. पशू संवर्धन व कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांना सांगण्यात आल्या. उत्पादकता वाढवून जास्त उत्पन्न घेणे जोखीम व्यवस्थापन व शाश्वत पध्दती हरित मोहीम आदी विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

प्रगतीशील शेतकरी डॉ. विलास सुरोशे खेवारे, शंकर भोईर बांधिवली, मोतीराम घोरड डेहणोली, चांगो नीरगुडा आंबेगाव या प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी पी डी बनगर यांनी सूत्रसंचालन जगन कथोरे यांनी तर आभार प्रदर्शन गोकुळ जाधव यांनी केले

Web Title: Kisan Kalyan Sammelan organized by Agriculture Department at Ambegaon