Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Housing Society Scam : माझ्यासारख्या कलावंताने सर्वस्व पणाला लावून या प्रकरणाविरोधात आवाज उठवला हे चांगले झाले की वाईट या संभ्रमात गेले काही दिवस मी जगतो आहे. कारण त्याचे वाईट परिणाम गेल्या काही दिवसात आम्हाला अनुभवास येत आहेत.
Actor Kishor Kadam highlights fraud engineer appointment in his housing society, appeals to CM Devendra Fadnavis for strict action.

Actor Kishor Kadam highlights fraud engineer appointment in his housing society, appeals to CM Devendra Fadnavis for strict action.

eskal

Updated on

Summary

  1. अभिनेता किशोर कदम यांनी त्यांच्या सोसायटीतील स्ट्रक्चरल ऑडिटर नियुक्तीतील गैरव्यवहार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इंजिनिअरवर गंभीर आरोप केले.

  2. त्यांनी PMC, बिल्डर आणि मॅनेजिंग कमिटीतील संगनमत उघड करत भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला.

  3. आवाज उठवल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मानसिक, सामाजिक आणि आर्थिक त्रास होत असल्याची तक्रार करून मुख्यमंत्री फडणवीसांकडे कारवाईची मागणी केली.

अभिनेते किशोर कदम यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराबाबत मोठा दिलासा दिला होता. मात्र किशोर कदम यांनी ते राहात असलेल्या सोसायटीबाबत एक भयंकर हादरवणारा प्रकार समोर आणत मुख्यमंत्र्यांना पुन्हा या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. काही वर्षांपूर्वी फोर्जरीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आणि परवाना रद्द करण्यात आलेल्या एका इंजिनियरला पुन्हा सोसायटीत स्ट्रक्चरल ऑडिटर म्हणून नेमण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी समोर आणला आहे. याबाबत किशोर कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com