स्पा, सलूनमध्ये AC सुरु ठेवल्यास कारवाई- किशोरी पेडणेकर

kishori pednekar
kishori pednekar file photo
Summary

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

मुंबई- राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. शहरातील अनलॉक कसा असेल याबाबत त्यांनी माहिती दिली. मुंबईत दुपारी चारवाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. पण, सायंकाळी जमावबंदी, संचारबदी सुरु असेल असं त्या म्हणाल्या आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असली तरी लोकांनी स्वयंशिस्त पाळण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या सहकार्यातूनच आपण कोरोनावर मात करु असं त्या म्हणाल्या. (kishori pednekar mumbai bmc corona unlock guidelines)

स्पा, सलून 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. पण, दुकानदारांना एसी बंद ठेवावा लागेल. कारण या माध्यमातून कोरोना पसरू शकतो. एसी सुरु ठेवल्याचं आढळल्यास कारवाई करण्यात येईल. मॉल्स, नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद असतील. लोकल अत्यावशक सेवेसाठी सुरु करण्यात आली आहे. बस सेवा सुरु असेल पण, प्रवाशांना उभे राहून प्रवासास परवानगी नसेल. पाचव्या स्तरातून येणाऱ्या खासगी वाहनांना मुंबईत परवानगी नसेल, अशी माहिती महापौरांनी दिली आहे. यासंदर्भात मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत उद्या बैठक घेणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

kishori pednekar
मोदी आणि योगींमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या वर्चस्वाला धक्का

हॉटेल, रेस्टाँरट यांना 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंस सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 4 नंतर त्यांना पार्सल सेवा सुरु ठेवता येईल. हॉटेल, रेस्टाँरटच्या कर्माचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, नागरिकांनी काही नियम पाळलेच पाहिजेत. अनलॉक करायचं तर लोकांची स्वत:ला स्वयंशिस्त लावावी. कोविड संकट संपलं नाही, आपण त्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांनी मास्क वापरालायला हवा, हात धुवायला पाहिजे, गर्दी केली नाही पाहिजे.

kishori pednekar
पाकिस्तानमध्ये दोन रेल्वेंची धडक; 30 जणांचा मृत्यू

दुसरी लाट भयानक होती. आता तिसरी लाट किती भयानक असेल सांगता येत नाही. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका आहे. त्यामुळे लाट येऊच नये म्हणून काळजी घ्यावी लागेल. मुंबईसह शेजारी महापालिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. मान्सूनच्या काळात साथीच्या रोगांपासून काळजी घ्यावी लागले. मुलांना बाहेरचं खाऊ घालू नका, ताजे अन्न खा असं पेडणेकर म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com