कोविड नियंत्रणात ठेवण्यासाठी BMC ने केलेल्या कामाबद्दल किशोरी पेडणेकर यांचा गौरव

समीर सुर्वे
Tuesday, 20 October 2020

कॉनफेर्डेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या वतीने मुंबईतील कोविड संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौरव करण्यात आला

मुंबई,ता.२०: कॉनफेर्डेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या वतीने मुंबईतील कोविड संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौरव करण्यात आला. (CII) सीआयआयच्या पश्‍चिम विभागाच्या आरोग्य टास्क फोर्सचे प्रमुख जॉय चक्रबर्ती यांनी आज प्रशिस्त पत्रक देऊन महापौरांचा गौरव केला.

महत्त्वाची बातमी : शिवसेनेचा क्रमांक घसरला, राजकीय पक्षांच्या वार्षिक प्रगतीपुस्तकात कोण अव्वल ?

मुंबई कोविडच्या संकटावर अत्यंत प्रभावी पणे नियंत्रण ठेवत आहे.महापालिकेचे टिम अविरतपणे प्रयत्न करत असून ती कौतुकास्पद आहे.असे महापौरांनी नमुद केले. सीआयआय बरोबरच इंडियन बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनेही महापौरांचा कोविड योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. चेंबर चे संस्थापक विकास मित्रसेन यांच्या हस्ते महापौरांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. ‘हा मुंबईतील नागरीकांचा गौरव आहे. नागरीकांनी सहकार्य केल्यामुळे संसर्ग नियंत्रण ठेवण्यात महापालिकेला यश आले आहे.असे महापौरांनी नमुद केले.

महत्त्वाची बातमी : आता N95 मास्क मिळणार 19 ते 49 रुपयांपर्यंत, दुपदरी आणि तीन पदरी मास्क 4 रुपयांना

Kishori Pednekar praised for the work done by BMC to keep covid under control


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kishori Pednekar praised for the work done by BMC to keep covid under control