
सोमवारी मुंबईतील ताज हॉटेलबाहेर एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही गाड्यांची तपासणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. त्यानंतर प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.