जाणून घ्या 'अंजीर' खाण्याचे रहस्यमय फायदे

जाणून घ्या 'अंजीर' खाण्याचे रहस्यमय फायदे

मुंबई - ड्रायफ्रूट खाण्याचे भरपूर फायदे असतात. हे आपण नेहमीच ऐकत असतो आणि वाचत असतो. पण असं एक फळ तुम्हाला माहिती आहे का जे तुम्ही फळ म्हणूनही खाऊ शकता आणि तेच फळ वाळलं की त्याच रूपांतर ड्राय फ्रूटमध्ये होतं. ते फळ आहे 'अंजीर'. अंजीर हे फळ खूप कमी लोकांनी बघितलं असेल. मात्र ड्रायफ्रूट मधील अंजीर सर्वांना ठाऊक आहे. पण फक्त ड्रायफ्रूट अंजीर नव्हे तर अंजीर फळ खाणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. जाणून घेऊयात अंजिराचे काही रहस्यमय फायदे.  

अंजीर का खावं ?

अंजीरमध्ये आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असं विटॅमीन ए, सी आणि के असतं. तसंच पोटॅशियम, कॉपर, झिंक, आयर्न आणि कॅल्शियम यासारखे तत्वही असतात. १०० ग्राम वाळलेल्या अंजीरमध्ये २०९ कॅलरीज, ४ ग्राम प्रोटीन्स, १.५ ग्राम फॅट, ४८.६ ग्राम कार्बोहायड्रेट आणि ९.२  ग्राम फायबर असतं. अंजीरमध्ये नैसर्गिक शुगरही असते.

हे आहेत अंजीर खाण्याचे फायदे:
 
(१) हृदयासाठी उपयुक्त आहे अंजीर:

अंजीर खाल्ल्यामुळे हृदयाचे काम सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होते. तसंच शरीरात तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सला संपवण्यासाठी अंजीरमध्ये आसलेले अँटिऑक्सिडंट मदत करतात. अंजीरमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड असतं ज्यामुळे हृदय सुरक्षित राहण्यास मदत होते.

(२) डायबीटीज नियंत्रणात उपयुक्त :
 
अंजीरमध्ये असलेल्या एक तत्वामुळे शरीरात इंसुलिन निर्माण करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे डायबीटीज कंट्रोल करण्यात मदत होते.

(३) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयोगी :

अंजीरमध्ये सोल्यूबल फायबरचे प्रमाण अधिक ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी मदत होते. तसंच फायबरमुळे पचन क्षमता वाढते आणि एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल शरीरातून नाहीसं होतं.

(४) पचन क्षमता वाढवते अंजीर:

अंजीरमध्ये असलेल्या डायट्री फायबरमुळे पचन क्षमता वाढण्यासाठी मदत होते. तसंच सतत अपचनाच्या समस्यांपासून अंजीर मानवी शरीराला सुरक्षित ठेवते.

(५) ऍनिमियापासून अंजीर करते संरक्षण :

जेंव्हा शरीरात आयर्न म्हणजेच लोहाची कमी होते, तेंव्हा ऍनिमिया होतो. मात्र अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते त्यामुळे अंजीर ऍनिमिया कमी करण्यासाठी मदत करते.

(६) दम्यापासून सुटका:
 
अंजीरमध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकांमुळे शरीरात कफ कमी होतो. याचसोबत दम्यापासून देखील अंजीर आपलं संरक्षण करतो.
 
(७) ब्लडप्रेशर पासून मुक्तता:

अंजीरमध्ये असलेल्या पोटॅशियम आणि फायबरमुळे ब्लडप्रेशर कंट्रोल ठेवण्यात मदत होते.

(८) हाडांसाठीही अंजीर फायद्याचं:

अंजीरमध्ये असलेल्या कॅल्शियममुळे हाडं मजबूत राहण्यासाठी मदत होते.

त्यामुळे रोज २-३ अंजीर खाणं मानविऊ शरीरसाठी फायद्याचं आहे.  

know unknown fact about anjeer fruits and its health benefits  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com