मुंबई-अलिबाग बोट प्रवास तासाभरात! 'हे' आहेत दर...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

बहुप्रतिक्षित अलिबाग ते भाऊचा धक्का रो-रो सेवेचे दरपत्रक महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने जाहीर केले आहेत. वाहनाच्या आकारानुसार ते असून किमान तिकीट दर 1100 रुपये आहे. ही सेवा मार्चपासून सुरू होईल. 

नवी मुंबई : बहुप्रतिक्षित अलिबाग ते भाऊचा धक्का रो-रो सेवेचे दरपत्रक महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने जाहीर केले आहेत. वाहनाच्या आकारानुसार ते असून किमान तिकीट दर 1100 रुपये आहे. ही सेवा मार्चपासून सुरू होईल. 

ही बातमी वाचली का? चिकूची आवक 30 टक्क्यांनी घटली

अलिबाग (मांडवा) ते भाऊचा धक्का या मार्गावरील रो-रो सेवा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. आता दोन्ही बाजूला जेट्टींचे काम झाले असून सेवेसाठी ग्रीसवरून बोट आणण्यात आली आहे. दीड हजार प्रवासी आणि 200 वाहने वाहून नेण्याची तिची क्षमता आहे. 95 मीटर लांब आणि 18 मीटर रुंद असणारी ही बोट 15 मैल प्रति तास वेगाने चालणार आहे. 

ही बातमी वाचली का? महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना 'मोठा' दिलासा 

मेरिटाईम बोर्डाने जाहीर केलेल्या दरानुसार एका प्रवाशासाठी 220 रुपयांपासून पुढे आकारण्यात येणार आहे. वातानुकूलित आणि लक्‍झरी सेवेसाठी 330 ते 550 पर्यंत दर आहे. तर वाहनांच्या आकारानुसार 1100 पासून 1900 पर्यंत आकारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या वतीने ही सेवा सुरू होत आहे. 

ही बातमी वाचली का? अंबा नदीतील मासे नको रे बाबा!

वेळेची बचत 
वाहनाद्वारे मुंबईतून अलिबागला जाण्यासाठी सुमारे साडेतीन तास लागतात. रो-रो सेवेमुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर अवघ्या एक तासात पार करणे शक्‍य होणार आहे. वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. 

ही बातमी वाचली का? राज्यसभेसाठी नेत्यांची 'फिल्डिंग'; वाचा कोण-कोण आहे 

असे आहेत दर 
सामान्य प्रवासी सेवा - 220 
वातानुकूलित - 330 
लक्‍झरी सेवा - 550 
लहान आकारातील वाहनांसाठी - 1100 
मध्यम आकारातील वाहनांसाठी - 1500 
मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी - 1900  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Alibag Ro-Ro service rates announced