१२० कोटी खर्चून मंत्र्यांसाठी सरकार बांधणार १८ माजली टॉवर ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

मुंबई - एकीकडे  सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, तर दुरीकडे महाराष्ट्र राज्य सरकारकडून १२० रुपये खर्चून मंत्र्यांची १८ माजली टोलेजंग इमारत बांधण्याचा प्रस्ताव सरकारच्या हाय पावर कमिटीत ठेवण्यात आलाय. मंत्र्यांच्या बंगल्यांच्या होणाऱ्या नूतनीकरणावरून आधीच सरकारवर जोरदार टीका केली जातेय. अशात मंत्र्यांसाठी टोलेजंग इमारत बांधण्याच्या प्रस्तावामुळे विरोधक चांगलेच खवळलेत. मुंबईतल्या मलबार हिल परिसरात ही टोलेजंग इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर येतेय. मलबार हिल परिसरातील तब्ब्ल १०५ वर्ष जुना बंगला पडून तिथे १८ मंत्र्यांसाठी १८ मजली टोलेजंग इमारत बांधण्यात येणार आहे.

मुंबई - एकीकडे  सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, तर दुरीकडे महाराष्ट्र राज्य सरकारकडून १२० रुपये खर्चून मंत्र्यांची १८ माजली टोलेजंग इमारत बांधण्याचा प्रस्ताव सरकारच्या हाय पावर कमिटीत ठेवण्यात आलाय. मंत्र्यांच्या बंगल्यांच्या होणाऱ्या नूतनीकरणावरून आधीच सरकारवर जोरदार टीका केली जातेय. अशात मंत्र्यांसाठी टोलेजंग इमारत बांधण्याच्या प्रस्तावामुळे विरोधक चांगलेच खवळलेत. मुंबईतल्या मलबार हिल परिसरात ही टोलेजंग इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर येतेय. मलबार हिल परिसरातील तब्ब्ल १०५ वर्ष जुना बंगला पडून तिथे १८ मंत्र्यांसाठी १८ मजली टोलेजंग इमारत बांधण्यात येणार आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर जवळपास पाच हजार स्केअर फूट क्षेत्रफळाचं बांधकाम केलं जाणार आहे. इतकंच नाही तर एका मजल्यावर एक अशा स्वरूपात या इमारतीमधील दालनांचं वाटप करण्यात येणार आहे अशी देखील माहिती समोर येतेय.

मोठी बातमी - आणि अजमल कसाब म्हणाला "भारत माता की जय..." 

दरम्यान ही बातमी समोर येताच विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध केलाय. "अशाप्रकारे बंगले तोडून इमारती उभ्या करणं, यामागचा उद्देश मला समजत नाहीये. सरकारकडून अत्यंत चुकीचा असा निर्णय घेण्यात आलाय. सरकारला काय झालंय काही कळत नाही. महाराष्ट्र शासन ही 'प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूट नाही'. शेतकऱ्यांचे प्रश्न, विकासाचे मुद्दे यावर शासनाचं लक्ष नसून, नको त्या गोष्टींकडे शासनाचं जास्त लक्ष आहे", असं विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते  प्रवीण दरेकर म्हणालेत.    

मोठी बातमी - मटणावरून मैत्रीत मिठाचा खडा; सुनील मटण संपलंच कसं म्हणत छातीत टाकला...

"मंत्र्यांना राहण्यासाठी सरकार १२० कोटी रुपये खर्च करून इमारत बांधणार आहे. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?" असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केलाय. हा महाराष्ट्रातील करदात्यांचा पैसे आहे, या पैशांची सरकार नासाडी करत असल्याची टीका भाजप नेते राम कदम यांनी केलीये. महाराष्ट्रातील शेतकरी होरपळतोय, शेतकऱ्यांना मदत करायचं सोडून मंत्र्यांची १२० कोटी रुपयांची बिल्डिंग बांधणं हे योग्य नसून या सरकारने ताबडतोब हे धंदे बंद करावे", असं राम कदम म्हणालेत. 

maharashtra state government to build 18 storied building for the minister of maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state government to build 18 storied building for the minister of maharashtra