esakal | ठाण्यातील 'या' गावाचे बेटात रूपांतर; ...सुविधा पुरवण्याचे न्यायालयाचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील 'या' गावाचे बेटात रूपांतर; सुविधा पुरवण्याचे न्यायालयाचे आदेश
  • बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोळे-वडखळ गाव गुरुवारपासून पाण्याने वेढले गेल्याने गावाचे बेटात रूपांतर झाले आहे. तेथील लोकांना होडीतून प्रवास करावा लागत आहे.
  • चोहोबाजूला पाणी असल्याने होडीतून प्रवास करण्यास घाबरणारी सुमारे तीस कुटुंबे गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला बांधलेल्या झोपड्यांमध्ये राहात आहेत. 

ठाण्यातील 'या' गावाचे बेटात रूपांतर; ...सुविधा पुरवण्याचे न्यायालयाचे आदेश

sakal_logo
By
मुरलीधर दळवी

मुरबाड : बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोळे-वडखळ गाव गुरुवारपासून पाण्याने वेढले गेल्याने गावाचे बेटात रूपांतर झाले आहे. तेथील लोकांना होडीतून प्रवास करावा लागत आहे. चोहोबाजूला पाणी असल्याने होडीतून प्रवास करण्यास घाबरणारी सुमारे तीस कुटुंबे गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला बांधलेल्या झोपड्यांमध्ये राहात आहेत. 

ही बातमी वाचली का? भरपावसात भाविकांची खरेदीसाठी झुंबड; गणेशोत्सवामुळे फुलांना सोन्याची झळाळी..!

बारवी धरणाची उंची वाढल्यामुळे मागच्या वर्षीपासून कोळे गावाला जाणारा रस्ता पाण्याखाली जात आहे. तेथील लोकांना होडीतून प्रवास करण्यासाठी एमआयडीसीतर्फे सोय केली आहे, तर तळ्याची वाडी येथे गावाच्या तीन बाजूला पाणी व एका बाजूला जंगल यामुळे गावात जाण्यास रस्ताच नाही, तेथील एका महिलेला प्रसूतीसाठी झोळीमधून आणावे लागल्याचे वृत्त "सकाळ'ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. 

ही बातमी वाचली का? बदल्यांवरून एसटी महामंडळात सावळागोंधळ,  अद्यापही 15 टक्के बदली प्रक्रीया रेंगाळली

तळ्याची वाडी येथील विहिरीजवळ धरणाचे पाणी आल्याने पाणी प्रदूषित होते. गावात साप- विंचू येतात, त्यामुळे तेथे पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा, पेस्ट कंट्रोल सुविधा द्यावी. तळ्याची वाडीचे अन्य धरणग्रस्तांप्रमाणे पुनर्वसन होईपर्यंत एमआयडीसीतर्फे खावटी वाटप करावे, सामूहिक व व्यक्तिगत वनहक्क धरणात गेल्याने त्याची भरपाई व पुनर्वसन करावे, गावात विविध सुविधा उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईतील जैन मंदिरं 'या' दिवशी उघडणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सुविधा पुरवण्याचे न्यायालयाचे आदेश 
कोळे-वडखळ व तळ्याची वाडी येथील गावचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे येथील लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने 5 ऑगस्ट रोजी दोन आठवड्यांत या ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा व वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. 
-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

loading image
go to top