
डोंबिवली : लाख रुपयांची उधारी जीवावर बेतली; मित्राच्या भावाने केला खून
डोंबिवली : मित्राला एक लाख रुपये (one lac lend money) तिने उसने म्हणून दिले होते. उसने दिलेले पैसे परत दे म्हणून तिने त्याच्याकडे तगादा लावला होता. शनिवारी रात्री पुन्हा ती मित्राकडे पैसे मागण्यासाठी गेली असता मित्राच्या भावाने चाकूने तिच्यावर वार करुन तिची हत्या (woman Murder) केल्याची घटना कल्याण (Kalyan) पश्चिमेत घडली आहे. रंजना जैसवार (वय 45) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी विजय राजभर (culprit arrested) याने दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन पोलिसांना स्वतः आपण खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात (kolsewadi police station) गुन्हा नोंद करण्यात आला असून विजय याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचा विषय चिघळला, आणखी एका अधिकाऱ्याची उचलबांगडी
कल्याण पश्चिमेतील चक्कीनाका येथील शास्त्रीनगर टेकडी परिसरात रंजना जैसवार रहाण्यास असून त्यांचा पार्लरचा व्यवसाय आहे. याच परिसरात राहणारा अजय रासभर याच्याशी रंजनाचे मैत्रीपूर्ण संबंध होते. दोस्तीखातीर तीने अजयला लाख रुपये उधार दिले होते. उधार दिलेले रुपये पुन्हा द्या यासाठी तिने सतत अजयच्या पाठी तगादा लावला होता. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास ती अजयच्या घरी उधारीचे पैसे मागण्यासाठी गेली. यावेळी अजय घरी नव्हता अजयचा भाऊ विजय व आई लालसा देवी यांच्याशी रंजना यांचा वाद झाला.
या वादात विजयने रंजना हिच्यावर चाकूने सपासप वार केले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी 7 च्या सुमारास विजय याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात येऊन रंजना हिस आपण चाकूने मारले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असता महिलेच्या शरीरावर चाकूने वार झाल्याचे आढळून आले.
याप्रकरणी रंजना हिचे पती राजेश जैसवार यांच्या फिर्यादीवरुन विजय व लालसादेवी यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय याला अटक करण्यात आली असून याचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी दिली.
Web Title: Kolsewadi Police Arrested Culprit Vijay Rajbhar In Woman Murder Case Kalyan Crime Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..