कोकण मंडळाच्या घरांची डिसेंबरमध्ये लॉटरी; पाहा किती आणि कुठे आहेत घरं

कोकण मंडळाच्या घरांची डिसेंबरमध्ये लॉटरी; पाहा किती आणि कुठे आहेत घरं

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे सहा हजार 651 घरांची सोडत डिसेंबर अखेरपर्यंत निघणार आहे. यात सुमारे पाच हजार घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधली जाणार आहेत, तर 20 टक्के घरे खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणार आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 'सर्वांसाठी घरे' ही मोहीम राज्यात सर्वत्र राबवली जात आहे. 2020 पर्यंत जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा करून द्यायचा असल्याने, गृहनिर्माण क्षेत्रात काम करणाऱ्या म्हाडा प्रशासनाने कंबर कसली आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कल्याण शिरढोण आणि खोणी परिसरात प्रत्येकी 2500 घरे बांधली जाणार आहेत. या घरांचा आराखडा मंजूर झाला असून, 2021 पर्यंत ही घरे बांधून पूर्ण करण्याचा म्हाडाच्या कोकण मंडळाचा मानस असल्याचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. खासगी विकासकांकडून म्हाडाला घणसोली येथे 40, वालिव-वसई-पालघर येथे 15, मोघरपाडा ठाणे येथे दोन, पारसिक ठाणे येथे 16, भिवंडीत 161; तर माणकोली येथे 118 अशी एकूण 279; तर ठाण्यातील डावले गावात 28 घरे म्हाडाला मिळाली आहेत. खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असून, या इमारती पूर्णावस्थेत आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या पाच हजार घरांच्या योजनेची मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे काम 15 ते 20 दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर या घरांचा सोडत प्रक्रियेत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत कोकण मंडळाची ही सर्वांत मोठी सोडत प्रसिद्ध होणार असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.  

Webtitle : konkan mandal houses under affordable housing scheme

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com