कोकण रेल्वेच्या गर्दीवर 56 विशेष फेऱ्यांचा उतारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या 626 फेऱ्या
मुंबई - उन्हाळी सुटीसाठी मध्य रेल्वे विविध मार्गांवर 626 उन्हाळी विशेष फेऱ्या चालवणार आहे; तर कोकणात जाणाऱ्यांची गर्दी विचारात घेऊन या मार्गावर 56 विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या 626 फेऱ्या
मुंबई - उन्हाळी सुटीसाठी मध्य रेल्वे विविध मार्गांवर 626 उन्हाळी विशेष फेऱ्या चालवणार आहे; तर कोकणात जाणाऱ्यांची गर्दी विचारात घेऊन या मार्गावर 56 विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे 1 एप्रिल ते 29 जूनपर्यंत विशेष फेऱ्या चालवणार आहे. कोकण मार्गावर 56 फेऱ्या चालवण्यात येतील. सीएसटी ते सावंतवाडी रोडदरम्यान 7 एप्रिल ते 2 जूनदरम्यान दर शुक्रवारी विशेष गाडी चालवण्यात येईल. तिच्या नऊ फेऱ्या होतील. सावंतवाडी रोड ते सीएसटीदरम्यान 8 एप्रिल ते 3 जून या कालावधीत दर शनिवारी विशेष गाडी चालवण्यात येईल. तिच्या नऊ फेऱ्या होतील. तसेच एलटीटी ते करमाळीदरम्यान 7 एप्रिल ते 2 जून या कालावधीत दर शुक्रवारी विशेष गाडी चालवण्यात येईल. तिच्याही नऊ फेऱ्या होतील. करमाळी ते एलटीटीदरम्यान 7 एप्रिल ते 2 जून या कालावधीत दर शुक्रवारी विशेष गाडी चालवण्यात येईल.

एलटीटी-सावंतवाडी दरम्यान 1 एप्रिल ते 4 जून या कालावधीत दर शनिवारी विशेष गाडी सोडण्यात येईल. सावंतवाडी ते एलटीटी दरम्यान 2 एप्रिल ते 4 जून या कालावधीत दर रविवारी विशेष गाडी सोडण्यात येईल. त्याचप्रमाणे अजनी (नागपूर)-मडगांव (गोवा)- अजनी 20, एलटीटी-साईनगर शिर्डी- एलटीटी 26, दादर-साईनगर शिर्डी-दादर 26, नागपूर-पुणे-नागपूर 22, पुणे-बिलासपूर-पुणे 26, हजुर साहेब नांदेड-अजनी-हजुर साहेब नांदेड दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील. त्यांच्या 26 फेऱ्या होतील. सीएसटी-लखनऊ-सीएसटी गाडीच्या 52 फेऱ्या, सीएसटी-जम्मू तवी-सीएसटी गाडीच्या 26, एलटीटी-गोरखपूर-एलटीटी गाडीच्या 26 फेऱ्या, एलटीटी-मण्दूवाडिह-एलटीटी गाडीच्या 24 फेऱ्या, सीएसटी-पटना-सीएसटीच्या 26, पुणे-एर्नाकुलम-पुणे 20, पुणे-पटणा-पुणे 26, पुणे-तिरुनेलवेली-पुणे 20 फेऱ्या चालवण्यात येतील.

एसटीच्याही विशेष फेऱ्या
एसटीनेही राज्यभर जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या प्रमुख शहरातून दररोज सुमारे 177 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी या जादा गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्याचे आरक्षण ऑनलाईन करता येईल.

Web Title: konkan railway