

Konkan Railway
ESakal
मुंबई : कोकणात मॉन्सून दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने रेल्वे सुरक्षेसाठी विशेष तयारी सुरू केली आहे. अतिसंवेदनशील रेल्वे मार्गांवर रात्रीची गस्त वाढविण्यासह धोकादायक ठिकाणी चोवीस तास वॉचमन तैनात करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे महामंडळाच्या सुरक्षा विभागातर्फे रत्नागिरी येथे पावसाळी गस्तीविषयी सुरक्षा परिसंवाद आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे.