
मुंबई : कोकण मार्गावर धावणाऱ्या दादर - सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस या एकमेव दैनंदिन गाडीला प्रचंड प्रवासी प्रतिसाद असूनही, वेळापत्रकातील तांत्रिक त्रुटींमुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गाडीच्या वेळापत्रकातील अनावश्यक ‘स्लॅक टाईम’ (सुटसुटीत वेळ) आणि दीर्घ थांबे तातडीने कमी करावेत, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली आहे.