
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या नेहमीच मोठी असते. त्यामुळे याकाळात अनेकांना रेल्वेचं आरक्षण मिळत नसल्यामुळे हाल होत असल्याचे दिसून येते. दरम्यान गणेशोत्सवात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी जादा गाड्या सोडण्यात येतात. यामुळे कोकणात जाणाऱ्यांना चांगलाच फायदा होत असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि आरामदायी होतो.