हुश्श.. ! पनवेलहून मडगावच्या दिशेने ट्रेन जाण्याचा मार्ग मोकळा..

हुश्श.. ! पनवेलहून मडगावच्या दिशेने ट्रेन जाण्याचा मार्ग मोकळा..

मुंबई, ता. 13 : खेडनजिक घसरलेल्या मालगाडीमुळे विस्कळीत झालेला मार्ग सुरळीत केल्याचे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे, त्यामुळे गुरुवारी पहाटे पनवेलहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रेन उपलब्ध असेल अशीच चिन्हे आहेत. 

कोकण रेल्वेवरुन मुंबईकडे येणारी मालगाडी रविवारी घसरली होती, त्यामुळे नऊ डबे रेल्वे ट्रॅकवरुन उतरले होते. अंगाची लाही करणारे उन, मजूरांची चणचण तसेच अवघड घाट यामुळे ट्रॅक पुन्हा सुरु करण्याचे काम अवघड झाले होते. रविवारी घसरलेल्या मालगाडीने श्रमिक स्पेशलच नव्हे तर नव्याने सुरु झालेल्या दिल्ली - तिरुवअनंतपुरम या मार्गावरील ट्रेन (02432) धावणार का हा प्रश्न होता. मात्र आता हे काम पूर्ण झाले असल्याचे कोकण रेल्वेने सांगितले आहे. 

कोकण रेल्वेवरील या अपघातामुळे थिवम ते उधमपूर (जम्मू काश्मीर) तसेच मडगाव ते उधमपूर या श्रमिक स्पेशल ट्रेनचा मार्ग बदलावा लागला होता. या ट्रेन कोकण रेल्वेमार्गे जाण्याऐवजी दक्षिण पश्चिम रेल्वे मार्गाने नेण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वेने सुरु केलेल्या नव्या ट्रेनबाबतही अनिश्चितता होती. मात्र आता दिल्ली-तिरुवअनंतपुरम मार्गावरील ट्रेन कोकण रेल्वे मार्गाने जाणार हे निश्चित झाले आहे. या मार्गावरुन दिल्ली - मडगाव ट्रेनही धावणार आहे. तिला रत्नागिरी हा थांबाही देण्यात आला आहे. 02414 या क्रमांकाची ही ट्रेन सकाळी 5.13 वाजता पनवेलहून सुटेल आणि रत्नागिरीला 9.30 वाजता तर मडगावला 12.50 वाजता पोहोचणार आहे. 

मुंबईतील माहूलहून कर्नाटकातील मंड्याकडे खत घेऊन जात असलेल्या मालगाडीचे नऊ डबे रविवारी दुपारी रुळावरुन घसरले. त्यातील काही मुख्य ट्रेनपासून वेगळे झाले. तीन इंजिनासह खेडच्या दिशेने गेले तर सहा ट्रॅकवरच अडकून राहिले. आता या डोंगराळ भागात वॅगनमधील सुमारे बाराशे फर्टीलायझर्स बॅग खाली करुन पुन्हा चढवण्याचे आव्हान होते. त्यातच ट्रॅकचेही नुकसान झाले होते. कोरोनाच्या साथीमुळे कामगार मिळण्यातही अडचणी झाल्या. मडगावहून वॅगन मागवण्यात आल्या. या वॅगन दूर करण्याचेच ऑपरेशन 24 तास चालले. त्यातच पावसाची शक्यता असल्याने उतरवलेल्या खताच्या बॅग झाकणेही भाग पडले. 

चाळीस अंश तपमानात ट्रॅक दुरुस्तीचे काम करणे अवघड होते. त्याचबरोबर हे काम चढावावर होते. वाढत्या तपमानामुळे ट्रॅकसह तो वसवण्यासाठी असलेले साहित्यही तापत असल्याने काम जास्तच जिकरीचे झाले होते. त्यामुळेही कामास विलंब झाला. मात्र अखेर बुधवारी सकाळपर्यंत सर्व काम पूर्ण झाले आणि त्या मार्गावरुन मालगाडीही रवाना झाली.

konkan railway tracks are cleared train will run from panvel to madgaon

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com