esakal | कोरोना रुग्णांसाठी 40 खाटांचे 'आयसीयू', महापालिका आयुक्तांकडून आढावा 
sakal

बोलून बातमी शोधा

icu

हाजी अली येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे कोरोना रुग्णांसाठी 40 खाटांचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) तयार करण्यात येत आहे.

कोरोना रुग्णांसाठी 40 खाटांचे 'आयसीयू', महापालिका आयुक्तांकडून आढावा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : हाजी अली येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे कोरोना रुग्णांसाठी 40 खाटांचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) तयार करण्यात येत आहे. महापालिकेने लक्षणेविरहीत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी 35 हजार खाटा असलेली विलगीकरण केंद्रे तयार केली आहेत.

महत्वाची बातमी : मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत अमोल कोल्हेंनी राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी 

मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोनाचे 70 हजार रुग्ण आढळतील; त्यापैकी 3000 जणांना आयसीयूची गरज भासेल, असा अंदाज आहे. मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्यासह एनएससीआय येथील विलगीकरण केंद्राची पाहाणी केली. या विलगीकरण केंद्राची क्षमता 500 खाटांवरून 650 खाटांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 40 खाटांचा आयसीयू तयार करण्यात येत आहे. या कामाचा आढावा घेण्यात आला. सध्या या केंद्रात 274 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे वाचलत का  : अनेकांना जे जमत नाही ते 'या' तीन वर्षांच्या कबीरने केलं, पोलिसांनाही वाटलं लै भारी

महालक्ष्मी रेसकोर्स आणि वांद्रे-कुर्ला संकुलातही विलगीकरण केंद्रे तयार करण्यात येत आहेत. मुंबईतील 70 टक्क्यांहून अधिक कोरोना रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी विलगीकरण केंद्रे तयार करण्यात येत आहेत. आता पर्यंत 35 हजार खाटांची व्यवस्था असलेली विलगीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 
गोरेगाव येथील प्रदर्शन केंद्रातही महाकाय विलगीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. मरिन लाईन्स येथील जिमखान्यांच्या जागेवर 1000 खाटांचे विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे.

ICU of 40 beds for Corona patients, review by Municipal Commissioner

loading image
go to top