कोपरखैरणे अग्निशमन केंद्राला अखेर मुहूर्त

कोपरखैरणे अग्निशमन केंद्राला अखेर मुहूर्त
कोपरखैरणे अग्निशमन केंद्राला अखेर मुहूर्त

नवी मुंबई : अपुरे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीअभावी रखडलेल्या कोपरखैरणेतील नवीन अग्निशमन केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेला मुहूर्त मिळाला आहे. १ डिसेंबरपासून हे अग्निशमन केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू केले जाणार आहे. या केंद्रात नियुक्त केलेले अग्निशमन जवानांचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांना तत्काळ त्या केंद्रात रुजू केले जाणार आहे. हे मनुष्यबळ आणि अग्निबंब उपलब्ध केल्यावर खऱ्या अर्थाने कोपरखैरणेतील नागरिकांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. 

कोपरखैरणे सेक्‍टर-२ येथील भूखंड क्रमांक १ वर कोट्यवधी रुपये खर्च करून, अभियांत्रिकी विभागाद्वारे फेब्रुवारी २०१९ मध्ये नवीन अग्निशमन केंद्र तयार उभारण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणूक असल्यामुळे आचारसंहितेआधीच याचे लोकार्पण केले; परंतु तेव्हापासून वर्ष संपत आल्यानंतरही मनुष्यबळाअभावी हे अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच पालिकेने अग्निशमन विभागाकरीता २६० पदांवर भरती केली. ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवार अग्निशमनच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यामुळे भरती होऊनसुद्धा कोपरखैरणेचे अग्निशमन केंद्र सुरू करता येत नव्हते. अखेर या महिन्यात या पात्र उमेदवारांचे प्रशिक्षण संपणार असल्यामुळे १ डिसेंबरपासून कोपरखैरणेचे अग्निशमन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 

५० कर्मचारी नियुक्त
१ केंद्र अधिकारी, ३ सहायक केंद्र अधिकारी, ३५ अग्निशामक, ४ चालक आणि इतर कर्मचारी असे मिळून एकूण ५० कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी एक ब्रॅन्टो लिफ्ट व ३ आग विझवण्याचे बंब तैनात केले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com