esakal | "कोरेगाव भीमात हिंसाचार व्हावा हे पुनर्नियोजित होतं"
sakal

बोलून बातमी शोधा

"कोरेगाव भीमात हिंसाचार व्हावा हे पुनर्नियोजित होतं"

"कोरेगाव भीमात हिंसाचार व्हावा हे पुनर्नियोजित होतं"

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - सध्या महाराष्ट्रात एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय, हे प्रकरण आहे कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेचं. या प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वादंग सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरेगाव भीमा प्रकरणी SIT नेमून तपासणी करावी असं सांगितलं होतं. यानंतर तातडीने यात हस्तक्षेप करत केंद्राकडून कोरेगाव भीमा प्रकरणीची चौकशी  NIA कडे वर्ग करण्यात आली. दरम्यान महाराष्ट्र सरकारला याबाबत काहीही माहित दिली नसल्याचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी संगतीलाय. याप्रकरणी आता मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतायत.

मोठी बातमी - आता शिवभोजन थाळी येणार थेट तुमच्या दारी..

सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र सरकारने NIA कडून होणाऱ्या कारवाईत सहकार्य केलं नाही तर थेट संविधानिक पेच निर्माण होऊ शकतो असं म्हंटलं. यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांनी मुनगंटीवार यांना, 'महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करून दाखवावं' असं ओपन चॅलेंज दिलं. 

मोठी बातमी - देशातील सर्वात स्वस्त इलेक्‍ट्रिक एसयूव्ही बाजारात, ग्राहकांच्या पडणार खरेदीसाठी उड्या 

नवाब मालिकांचे गंभीर आरोप 

दरम्यान पुन्हा एकदा नवाब मलिक या प्रकरणी आणखी एक खुलासा करत कोरेगाव भीमा हिंसाचारावर भाष्य केलंय. कोरेगाव-भीमा हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. अनुसूचित जमातीविरोधात वातावरण निर्मितीसाठी हा भारतीय जनता पक्षाचा पूर्वनियोजित डाव होता, असा गंभीर आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. यासचोबत नवाब मलिक यांनी आणखीन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये, कोरेगाव भीमा प्रकरणी तपास NIA कडे आताच का दिला ? आणि राज्यात भाजप सरकार असताना केंद्राने कोरेगाव भीमाचा तपस NIA कडे का दिला नाही? असे सवाल मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केलेत.  

फडणवीसांची चौकशी करा 

कोरेगाव भीमा प्रकरण तापलंय. अशात राज्य आणि केंद्रातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लाखे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा, अशी मागणी चौकशी आयोगाकडे केलीये. 

मोठी बातमी - गुजरातमधून येणारा 'हा' पदार्थ तुम्हाला आजारी पाडू शकतो...

रिकाम्या हाती परतलं NIA चौकशी पथक  

केंद्रातून NIA चं एक पथक पुण्यात दाखल झालेलं. या पथकाने पुणे पोलिसांना कोरेगाव भीमा प्रकरणाच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने, पुणे पोलिसांनी NIA ला कोणतीही कागदपत्रे सुपूर्त केली नाही. यानंतर महाराष्ट्र पोलिस विरुद्ध केंद्र असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. 

koregaon bhima case serious allegations on former BJP government by Nawab Malik 

loading image