
मुंबई - कुर्ला पश्चिमेच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर सोमवारी (ता ९) रात्री बेस्ट बसच्या धडकेत झालेल्या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४९ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरे याला केवळ मिनीबस चालवण्याचा अनुभव होता. केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्याच्या हाती आधुनिक इलेक्ट्रिक बसचे स्टेअरिंग देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.