कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी चालकाचा जामीनासाठी अर्ज, कंत्राटदारावर केला गंभीर आरोप
Kurla BEST Accident News : कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणातील आरोपी चालकाने जामीनासाठी अर्ज केला आहे. जामीनसाठी अर्ज करताना त्यात तांत्रिक कारण आणि ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी चालक संजय मोरे याने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तांत्रिक कारणामुळे आणि ब्रेक फेल झाल्याचा दावा चालक संजय मोरे याने केला आहे. मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.