
BEST Bus Accident: कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बस अपघाताची चौकशी आणि तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये बेस्टमधील तांत्रिक आणि वाहतूकतज्ज्ञांचा समावेश करण्यात आला.
या समितीला १५ दिवसांत अहवाल सादर करायचा होता; मात्र बेस्टच्या महाव्यवस्थापकांसह समितीतील सदस्य सध्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात व्यग्र असल्याने समितीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे अपघाताच्या चौकशीबाबत बेस्ट उपक्रम गंभीर नसल्याचे दिसते.