Kurla bus accident passengers videoESakal
मुंबई
Kurla Accident: चेहऱ्यावर भीती अन् बाहेर पडण्यासाठी धडपड; अपघातावेळी बसमधील प्रवाशांची कशी होती अवस्था? पाहा व्हिडिओ
Kurla Bus Accident Update: कुर्ला अपघातादरम्यान बसमधील प्रवाशांची अवस्था नेमकी कशी होती? याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 जणांवर उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या चौकशीसाठी बेस्ट प्रशासनाने दोन समित्या स्थापन केल्या आहेत. आरोपी चालक संजय मोरे याला अटक केल्यानंतर मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या घटनेतील एक सीसीटीव्ही आता समोर आला आहे. ही घटना घडतानाच्या वेळी बसमधील प्रवाशांची काय मनस्थिती: होती हे या व्हिडिओतून दिसत आहे.

