
चेंबूर : कुर्ला येथील जरीमरी परिसरात तत्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणी करिता संतप्त रहीवाशांतर्फे पालिका एल विभागावर मोर्चा काढण्यात आला. कुर्ला येथील जरीमरी परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. या परिसरात लोकसंख्येनुसार अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे.