Mumbai News : कुवेतहून बोटीने भारतात आलेल्या 3 आरोपींना जामीन मंजूर

कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला.
Court
Courtsakal

मुंबई - कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणाच्या तपासात आरोपि विरोधात कोणताही संशयास्पद पुराव्ह किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.

या प्रकरणात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी प्रवीण मोदी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जामीन मंजूर केला आहे. कोणताही आक्षेपार्ह पुरावा सापडला नसल्याने आरोपींना तुरुंगात ठेवणे योग्य होणार नसल्याचे मत न्यायालयाने जामीन मंजूर करताना व्यक्त केले.

वाईट वागणूकीने त्रस्त

आरोपी नित्सो डिट्टो, विजय विनय अँथनी आणि सहयोग अनीश हे तामिळनाडूचे रहिवासी असून कुवेतला नोकरीच्या निमित्ताने गेले होते. परंतु कुवेतमध्ये त्यांच्या मालकाकडून मिळणाऱ्या वाईट वागणूकीमुळे त्यांना तेथून पळून जावे लागल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपीच्या वकीलांमार्फत दाखल केलेल्या आरोपीच्या जामीन अर्जात कुवेतमध्ये आरोपींचा छळ करण्यात आल्याचे म्हंटले आहे. कुवेतमधील त्यांच्या मालकाने त्यांचे पासपोर्ट काढून घेतले होते. 6 फेब्रुवारीला तिघे आरोपी शहराच्या किनाऱ्यावर पोहोचले. तेव्हा मुंबई पोलिसांनी त्याला कोणतेही कारण नसताना अटक केल्याचा दावा आरोपींच्या वकिलाने न्यायालयात केला. कुवेतच्या दूतावासाकडून मिळाली नसल्याचे सांगत पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध केला.

घटनाक्रम

6 फेब्रुवारी रोजी मंगळवारी संध्याकाळी कुवेतहून आलेली बोट थेट मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाला पोहोचली. प्राथमिक माहितीनुसार बोटीत तीन प्रवासी होते. अरबी समुद्रातून मुंबई पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयास्पद बोट अडवून तिघांनाही अटक केली. ढील तपासासाठी त्याला कुलाबा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या तिघांची पोलीस चौकशी करण्यात आली. तिघेही कुवेतमधून पळून येथे पोहोचले होते. आरोपी कुवेतमध्ये काम करत असे पण पैसे न मिळाल्याने तेथून त्यांनी पळ काढला. हे तिघेही भारतातून कुवेतमध्ये कामासाठी गेले होते. या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण झालेआहेत, त्यानुसार पोलिस एकामागून एक सर्व मुद्यांचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com