खोपोलीत लाड, थोरवे यांचा प्रचार

खोपोलीत लाड, थोरवे यांचा प्रचार

खोपोली (बातमीदार) : रविवारच्या सुट्टीच्या दिवसामुळे खोपोलीत प्रचाराचा पारा सकाळपासूनच गरम झाला. युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या शहरातील शिवसेना-भाजप व आरपीआय नेते व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार मोहीम राबविली. दुसरीकडे आघाडीकडूनही राष्ट्रवादी, काँग्रेस-शेकाप व समविचारी पक्षनेते व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन आघाडीचे उमेदवार लाड यांचा जोरदार प्रचार केला.

खोपोली शहर काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठकही रविवारी झाली. यात संपूर्ण शक्ती लावून शहरातील काँग्रेसची पारंपरिक चार ते पाच हजार मतांची शिदोरी आघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या पारड्यात टाकण्याचा संकल्प करण्यात आला. जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर, विद्यमान नगराध्यक्ष सुमन औसरमल, ज्येष्ठ नेते मोहन औसरमल, काँग्रेस शहराध्यक्ष रिचर्ड जॉन, शेकापचे किशोर पाटील, अविनाश तावडे व आघाडीचे १३ नगरसेवक व प्रमुख नेत्यांनी  आघाडीकडून प्रचाराची धुरा सांभाळली.

युतीकडून शहरप्रमुख व गटनेते सुनील पाटील, भाजप शहराध्यक्ष श्रीकांत पुरी, माजी नगरसेविका व जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ११ नगरसेवक व प्रमुख नेत्यांनी थोरवे यांच्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबविली.

खोपोली पालिका क्षेत्रातून कमीत कमी पाच हजार मतांची आघाडी सुरेश लाड यांना मिळवून देण्यासाठी आघाडीकडून नियोजन केल्याचे दत्ताजी मसूरकर यांनी सांगितले, तर युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना खोपोलीतून निर्णायक मतांची आघाडी मिळवून देऊ, असे सुनील पाटील यांनी या वेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com