fb threat
fb threat

तिने फेसबुकवर कमेंट केली आणि पुढे काय झालं..?

मुंबई : मुंबईतील झोपडपट्टीत कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळणेही अवघड जात आहे. दरम्यान, झोपडपट्टीतील सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या व्हिडीओ एका महिलेने फेसबुकवर पाहिला आणि अभिनंदन म्हणून दोन शब्द कमेंट म्हणून नोंदवले. मात्र त्यानंतर त्या महिलेला सुरु झालेला त्रास अखेर पोलिस ठाण्यात गेला. केवळ फेसबुकवरील पोस्टमुळे एका महिलेला नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटली आहे. 

स्टार्ट-अपशी संबधित व्यवसाय करणाऱ्या या 33 वर्षीय महिलेने फेसबुकवर ’सोशल डिस्टन्सिंग - अ मिथ इन स्लम्स’ हा व्हिडीओ पाहिला. तिला हा व्हिडिओ आवडल्याने तिने व्हिडिओ बनवणाऱ्या संबंधीत कार्यकत्यार्चे अभिनंदन केले. परंतु, त्याने या व्हिडीओबाबत विरोधी प्रतिक्रिया व्यक्त  केली. त्यानंतर व्हिडीओत टॅग करण्यात आलेल्या काही व्यक्तींनी या महिलेला ऑनलाईन ट्रोल करण्यास सुरुवात केली. तिने त्यापैकी अनेकांना ब्लॉक केले; मात्र हे प्रकार सुरूच राहिले. 

नंतर तर महिलेला अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून दूरध्वनी येऊ लागले. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने अश्लील व अपमानस्पद भाषेचा वापर करत संबंधित व्हिडीओवरील भाष्य काढून टाकण्यास तिला सांगितले. त्यानंतर या महिलेच्या कंपनीच्या ऑनलाईन लिंकवरही अपमानस्पद मजकूर येऊ लागला. त्यामुळे परदेशातील सहकारी या महिलेला दूरध्वनी करू लागले. अखेरीस या त्रासाला कंटाळून तिने गोरेगाव पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी धमकावणे व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com