
मुंबई 06 : मुंबईतील लालबाग परिसरात झालेल्या सिलेंडर स्फोटात एकूण 16 जण जखमी झाले आहेत. त्यातील 8 ते 10 जण गंभीररित्या भाजले असून जवळपास 60 टक्क्यांहून अधिक जखमा झाल्या असून सर्वांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. केईएममध्ये सध्या 12 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती ठिक असल्याचे ही सांगण्यात आले आहे. दरम्यान, इतर चार जणांवर मसीना या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे ही सांगण्यात आले आहे.
महत्त्वाची बातमी : राज ठाकरे यांच्याबाबत शरद पवारांनी केले भाष्य; म्हणाले तरुणाईत 'क्रेझ' कायम
सिलेंडर स्फोटाची घटना आज (रविवार) सकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत 16 जण होरपळून जखमी झाल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली. त्यानंतर, 7.40 च्या दरम्यान या जखमींना केईएम रुग्णालयात दाखल केले गेले. तात्काळ त्यांच्यावर उपचार करून त्यांना वाॅर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. सिलेंडरचा स्फोट झाल्याने यातील सर्वच ग॔भीर रित्या भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते. यात एक ही महिला रुग्ण नसून अनेकांना डोक्याला आणि पोटाला गंभीर पणे भाजले आहे. जवळपास 60 टक्क्यांहून अधिक या जखमा आहेत.
नवीन इमारतीच्या तळ मजल्यावरील वाॅर्डमध्ये या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भाजलेल्या घटनांमध्ये तात्काळ उपचार होणे गरजेचे होते. शिवाय, जखमांना संसर्ग होऊ नये म्हणून त्या सर्वांना आयसीयूमध्येच ठेवण्यात आले आहे. त्यापैकी दोन जणांना ऑक्सिजनही चढवण्यात आले आहे. त्यामुळे, सर्व सुविधा ही करुन ठेवण्यात आल्या आहेत असे ही केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या घरातील मुलीच्या आज लग्नाची हळद होती. त्यामुळे, या स्फोटामुळे घराचे आणि सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय, यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे ज्या घरात ही घटना घडली आहे त्या घरामध्ये राणे कुटुंबामध्ये आज मुलीची हळद होती आणि त्याचीच तयारी सुरू होती. यामध्ये मुलीचे वडील मंगेश राणे प्रचंड भाजले गेल्याची माहिती आहे.
( संपादन - सुमित बागुल )
Lalbaug cylinder blast more than ten people has injury more than sixty percent
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.