
Lalbaugcha Raja Visarjan
esakal
मुंबईचा गणेशोत्सव हा उत्साह आणि भक्तीचा संगम आहे, पण यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनाला झालेल्या उशिराने भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. अनंत चतुर्दशी संपून १५ तास उलटले तरी लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं होतं. अखेर अनेक प्रयत्नांनंतर बाप्पाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आलं, पण या उशिरामुळे कोळी बांधवांनी लालबागचा राजा मंडळावर गंभीर आरोप केले आहेत.