
Lalbaugcha Raja Visarjan 2025
ESakal
मुंबई : गणेशोत्सव सोहळ्याचा आज शेवटचा दिवस असून शनिवार (ता. ६) रोजी गणरायाचे विसर्जन होणार आहे. मुंबईत गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात असून बाप्पाचे विसर्जन पाहण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणाहून भाविक मुंबईत येतात. यावेळी नवसाला पावणारा लालबागच्या राजाचे विसर्जन सोहळा अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव असतो. हा सोहळा तब्ब्ल २४ ते २५ तास सुरु राहत असून भाविकांचा ओघही मोठ्या प्रमाणात असतो.